हनुमंत चिकणे :
उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने कामगार व मजुरांना फराळ देऊन त्यांची दिवाळी गोड केली आहे. या स्तुत्य उपक्रमामुळे उरुळी कांचन भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिवाळीच्या शुभमुर्हतावर उरुळी कांचन भाजपाच्यावतीने विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये किल्ले स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व (पाक) फराळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तब्बल ३०० हुन आधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे किल्ले स्पर्धेत कामगारांच्या मुलांनी अत्यंत रेखीव किल्ले व रांगोळ्या काढल्या. तर महिलांनी फराळ स्पर्धेत मोठा उत्साह दाखवून उस्पुर्त प्रतिसाद नोंदविला आहे.
दरम्यान, उरुळी कांचन भाजपाने फराळ स्पर्धेच्या माध्यमातुन ऊस तोडणी कामगार, वीटभट्टी कामगार, स्थलांतरीत नागरिक अशा ९० हून अधिक नागरिकांना फराळ वाटप केली. त्यामुळे दिवाळी सणापासून वंचित असणाऱ्या नागरिकांचीही यंदा दिवाळी गोड झाली आहे.
या स्पर्धेचे नियोजन पश्चिम महाराष्ट्र व्यापारी आघाडीचे अध्यक्ष विकास जगताप, क्षेत्रीय रेल्वे समिती सदस्य अजिंक्य कांचन, उरुळी कांचन भाजपचे शहराध्यक्ष अमित कांचन, आबासाहेब चव्हाण, खुशाल कुंजीर, ऋषिकेश शेळके, शुभम वल्टे, पूजा सणस, रेखा तुपे, रूपाली कांचन, काजल खोमणे, साक्षी ढवळे व स्पर्धेचे परीक्षक आभिजित दारवटकर यांनी केले होते.