Uruli kanchan : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयात कला शिक्षण म्हणून काम करणारे आबा गोरक्षनाथ सायकर (वय 52, सायकरवाडी, फुरसुंगी) यांचे आज सोमवारी (ता.9) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. विद्यार्थी प्रिय, अत्यंत प्रेमळ व हुशार व्यक्तिमत्व हरपल्याने पूर्व हवेलीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.








