शिक्रापूर (पुणे): शिरूर शहरातील स्टेट बँक कॉलनीमध्ये घरात बसलेल्या महिलेच्या गळ्याला तलवार लावून महिलेच्या गळ्यातील दागिने चोरीचा प्रयत्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत रेखा शिवाजी वाखारे (वय ४४, रा. स्टेट बँक कॉलनी शिरुर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात तीन युवकांवर गुन्हा दाखल केला आहे.
शिरुर शहरातील स्टेट बँक कॉलनी परिसरात राहणाऱ्या हिराबाई वाखारे या सायंकाळच्या सुमारास घरात असताना तीन अज्ञात युवक घरामध्ये आले. त्यांनी हिराबाई यांच्या गळ्याला तलवार लावून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान हिराबाई यांनी आरडाओरडा केल्याने घरात आलेले तिघेजण पळून गेले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहेत.