पुणे : अनोळखी नंबरवरून फोन केल्यास फोन करणाऱ्याचे नाव थेट दिसणार आहे, यामुळे फेक कॉल करणाऱ्यांना चांगलाच चाप बसणार आहे. स्पॅम कॉल रॊखण्यासाठी ट्रायच्या (TRAI) वतीने ही नवीन सुविधा लवकरच अमलात येणार आहे. या सुविधेमुळे सिम कार्ड घेताना ज्या व्यक्तीच्या नावाने फॉर्म भरला जाणार आहे, त्याच व्यक्तीचे नाव दिसणार आहे. त्यामुळे अनोळखी नंबर आपल्याकडे सेव्ह केलेला नसला तरी आपल्याला फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव कळू शकणार आहे.
कोणत्याही अँप्लिकेशन शिवाय नाव दिसण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता नंबर आणि नाव अशा दोन्ही गोष्टी दिसून येणार आहेत.लवकरच हे फिचर सर्वच फोनवर सक्रिय करण्यात येणार आहे. यापूर्वी ट्रूकॉलर नावाच्या अँप्लिकेशनद्वारे ही सुविधा उपलब्ध होत होती. मात्र या अँप्लिकेशनद्वारे मिळणारी माहिती १०० टक्के खरीच असेल याची शाश्वती नव्हती. मात्र ट्रायच्या सुविधेमुळे ग्राहकांना फेक कॉल ओळखता येऊन त्याच्यापासून बचाव करता येऊ शकेल.