लोणी काळभोर (पुणे)-“बदली” व्हावी यासाठी हवेली तालुक्यातील तलाठी संघटनेच्या एका पदाधिकाऱ्यांचे काम मागील दोन महिण्यापासुन “काम टाळो आंदोलण” सुरु केले आहे. शेतकरी लाठी कार्यालयात जाताच, ” मी फेरफार नोंदी करणार नाही, माझ्या तक्रारी करा, जेणेकरून या भागातून माझी बदली होईल. याठिकाणी मला काम करायचे नाही.” असे म्हणत संबधित तलाठी पदाधिकारी शेतकऱ्यांना आरेरावीची भाषा करत असल्याच्या तक्रारी हवेली तालुक्यातील बड्या गावातुन मोठ्या प्रमानात येऊ लागल्या आहेत.
हवेलीचे प्रांत अधिकारी संजय आसवले यांच्याकडे बदलीसाठी संबधित तलाठी महोदयांनी वेगवेगळ्या पध्दतीने ताकद लावण्याचा प्रयत्न केला. मात्र हवी त्या ठिकाणी बदली होत नसल्याचे लक्षात येताच, वरील तलाठी महोदयांनी “काम टाळो आंदोलण” सुरु केले असावे अशा उपसात्मक टिकेचे स्वर पुर्व हवेलीत उमटु लागले आहेत.ऑनलाईन ई म्युटेशन केलेले नोंदणीकृत दस्ताची नोंद अॅटोमॅटीक होणे गरजडेचे असतांना, संबधित तालाठी महोदयांनी मात्र ऑनलाईन ई म्युटेशन केलेले नोंदणीकृत दस्त ऑफलाईन पध्दतीची वेगळीच चर्चा हवेलीच्या पुर्व भागात होऊ लागली आहे.
शेतकऱ्यांनी फेरफारसाठी विनंती कऱण्याचा प्रयत्न केल्यास अथवा ओळख काढुन गेल्यास, संबधित तलाठी महोदय काम घेऊन आलेल्या शेतकऱ्यास ” मी फेरफार नोंदी करणार नाही,माझ्या तक्रारी करा, जेणेकरून याभागातून माझी बदली होईल. याठिकाणी मला काम करायचे नाही.” असे महणुन हाकलुन देत असल्याचा आरोप पुर्व हवेलीमधील नागरीक करीत आहे. दिवसेंदिवस संबंधित तलाठ्याची मुजोरी वाढत असून मात्र यामुळे खातेदार शेतकऱ्यांची कामे खोळंबली असून त्यांची अडवणूक होऊ लागली आहे. याबाबत या भागाचे आमदार, स्थानिक लोकप्रतिनीधी यांनी लक्ष घालुन, शेतकऱ्ंयाची अडवणुक कमी करण्याची गरज आहे.
याबाबत बोलतांना हवेली तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष विनायक शिंदे म्हणाले, दीड महिन्यापुर्वी नोंदणीकृत दस्ताचे ई म्युटेशन झालेले आहे परंतु संबधित तलाठ्याने अजूनही फेरफार नोंद घेतलेली नाही.तलाठी कार्यालयात नोंदणीकृत दस्ताची एक प्रत सादर केलेली आहे तरीदेखील अजूनही फेरफार झालेला नाही त्यामुळे संबंधित तलाठ्याची चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करावीअशी आमची विनंती आहे.
याबाबत हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले म्हणाले, बधित गावात फेरफारची कामे रखडल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. संबधित विषयामध्ये हवेली तहसिलदारांना योग्य त्या सूचना केलेल्या असून प्रस्तुतच्या प्रकरणात चौकशी करून अहवाल मागितला आहे. यामध्ये दोषी असणा-या वर कठोर कारवाई कारवाई केली जाईल.