पुणे : केंद्रीय लोकसेवा लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये शक्ती दुबे यांनी पहिला रँक पटकावला आहे. तर हर्षिता गोयल दुसऱ्या क्रमांकावर आणि अर्चित डोंगरे तिसऱ्या क्रमांकावर आहे. अर्चित हा पुण्यातील रहिवाशी असून देशात तिसरा क्रमांक मिळवत त्याने महाराष्ट्राची व पुण्याची मान उंचावली आहे.अर्चितच्या या यशाने त्याच्या कुटुंबीयांना आनंद झाला आहे.अर्चितने दिवस रात्र मेहनत करून हे यश मिळवल आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in यावर निकाल पाहू शकता..उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील शक्ती दुबेने युपीएससी परीक्षेत देशात अव्वल स्थान पटकावलं आहे. तर पुण्याचा अर्चिंत डोंगरे देशात तिसरा आला आहे. सरकारच्या अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 1129 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील 180 पदं, भारतीय परराष्ट्र सेवेतील 55 पदं आणि भारतीय पोलिस सेवेतील 147 पदं समाविष्ट आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2024 टॉपरची नावं
शक्ति दुबे
हर्षिता गोयल
डोंगरे अर्चित पराग
शाह मार्गी चिराग
आकाश गर्ग
कोमल पुनिया
आयुषी बंसल,
राज कृष्ण झा
आदित्य विक्रम अग्रवाल
मयंक त्रिपाठी