भंडारा : भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पुयार येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या एका सहा वर्षीय चिमूकलीचा विद्युत करंट लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही दुर्देवी घटना आज 3 जुलैच्या सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली . यशस्वी सोपान राऊत (वय 6 वर्ष, रा.पुयार) असं या मृतक विद्यार्थिनीचं नावं आहे.शाळा सुरु होऊन झाले होते. या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली असून राऊत कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
वॉशरूमला गेली असता लागला विजेचा करंट..
विदर्भातील जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांना 1 जुलैपासून सुरुवात झाली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं जोरदार स्वागत करण्याचं निर्देश शिक्षण विभागानं दिलं होतं. त्यानुसार सर्वत्र मोठ्या हर्ष उल्हासात विद्यार्थ्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. मात्र नवीन शैक्षणिक सत्रातील तिसऱ्याच दिवशी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील पहिल्या वर्गात शिकणाऱ्या एका चिमुकल्या विद्यार्थिनीचा शाळेतचं विद्युत करंट लागून मृत्यू झाला.
ही धक्कादायक घटना आज भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पुयार येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत घडली आहे. यशस्वी सोपान राऊत (वय6 वर्ष रा. पुयार) असं मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नावं आहे. आज सकाळी दहा वाजेपूर्वी यशस्वी राऊत ही विद्यार्थिनी शाळेत आली. लघुशंकेसाठी गेली असता तिला विजेचा करंट लागला आणि त्यातचं तिचा मृत्यू झाला. दरम्यान, लाखांदूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.