बुलढाणा : बुलढाण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील २० वर्षीय विद्यार्थिनी रेल्वे विभागाचा पेपर देऊन सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर आली असता त्या ठिकाणी अपघात होऊन तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवार (ता. २९) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
अधिक माहिती अशी की, वैष्णवी राजू खेडेकर (२०) असे मृत मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे अंत्री खेडेकर गावावर शोककळा पसरली आहे. चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील राहिवासी असलेले राजू तेजराव खेडेकर यांची मुलगी वैष्णवी राजू खेडेकर ही सिकंदराबाद येथे रेल्वे विभागाचा स्पर्धा परीक्षेचा पेपर देण्यासाठी गेली होती. तेवहा ही दुर्दैवी घटना घडली आहे.
पेपर देऊन ती घरी परत येण्यासाठी सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर आली. रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान रेल्वे अपघातात तिचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच गावावर दुःखाचा डोंगर कोसळला.