Uttar Pradesh Shocker : उत्तर प्रदेशमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. आई – बापाच्या निष्काळजीपणामुळे 6 महिन्याच्या बाळाला आपला जीव गमवावा लागला आहे. उत्तर प्रदेश राज्यातील महोबा या गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. म्हशीच्या शेणामुळे सहा महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर येत आहे.
म्हशीचे शेण बाळाच्या तोंडावर पडल्याने बाळाचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, महोबा जिल्ह्यातील कुलपहार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सातारी गावात मुकेश जाधव हे कुटुंबासोबत राहत आहेत. शेतीच्या मदतीने ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी त्यांची दोन मुले, तीन वर्षांचा यादवेंद्र आणि सहा महिन्यांचा आयुष, आई निकितासोबत घरी होते.
घरी जेवण बनवत असताना आईने रडत असलेल्या आयुषला म्हशीला बांधलेल्या गोठ्यात पाळण्यात झोपायला टाकले. यानंतर आई स्वयंपाक करू लागली. बराच वेळ बलाचा आवाज न आल्याने आईने त्याला हाक मारली, आवाज न आल्याने तिने उठून पाहिले तर बाळाच्या चेहरा शेणाने झाकलेला होता.
दरम्यान बाळाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी बाळाला मृत्य घोषित केलं. यामुळे बलाचा गुदमरून मृत्यू झाला. निरागस बाळाच्या मृत्यूला म्हैस हीच कारण बनेल असं कोणालाच वाटलं नव्हत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.