लोणी काळभोर : पुणे – दौंड लोहमार्गावरील लोणी काळभोर- उरुळी कांचन यादरम्यान थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील काकडे मळा येथे अंडरपास बोगदा करावा. अशी मागणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे यांनी केली आहे.
दिल्ली येथील रेल्वेभवनातील रेल्वेमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी जगन गाडे यांची काकडे यांनी नुकतीच भेट घेऊन निवेदन दिले आहे. यावेळी खासदार संजय पाटील, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे-सोलापूर महामार्गावरून, श्रीक्षेत्र थेऊरकडे (जुन्या पुणे-सोलापूर महामार्गाकडे) जाताना पुणे ते दौंड हा दोन पदरी रेल्वेमार्ग जातो. थेऊरला येणाऱ्या भाविकभक्तांना व आजू बाजूच्या थेऊर, कुंजीरवाडी, नायगाव, पेठ, प्रयागधाम, सोरतापवाडी, उरुळीकांचन, बिवरी, कोरेगाव मूळ, कोलवडी, केसनंद, आळंदी अशा ८ ते १० गावांतील नागरिकांना याचा थेऊर व काकडे मळा परिसरातील नागरिकांना पुणे- सोलापूर महामार्गावरून ३ किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते.
थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील काकडे मळा येथे रेल्वेचा अंडरपास बोगदा झाला. तर याचा ८ ते १० गावांतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. असे युवराज काकडे यांनी सांगितले.
दरम्यान, दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतून मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेऊन पुणे- सोलापूर महामार्गावर स्वारगेट ते उरुळी कांचन दरम्यान, पूर्वी मागणी केलेल्या दुमजली उड्डाणपुलाबाबत, लवकरात लवकर सर्वेक्षण सुरु करण्याची मागणीही केल्याचे युवराज काकडे यांनी सांगितले.