सुरेश घाडगे
परंडा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त शहरात आयोजीत करण्यात आलेल्या “हर घर तिरंगा” अभियानांर्तगत महसुल विभागाच्या वतीने बुधवार (दि.१०) आयोजीत जनजागृती रॕलीत विविध शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी होऊन राष्ट्र प्रेमाचा संदेश दिला. देशप्रेमी गीत -संगीत व जयघोष याने परिसर दणाणून गेला होता .
परंडा येथील तहसील कार्यालय प्रांगणातुन सकाळी १० वाजता तहसिलदार रेणुकादास देवणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती रॕलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी रॕलीत पोलीस अधिकारी,महसुल अधिकारी,पंचायत समिती, नगरपालिका,गटशिक्षण कार्यालय,कृषी विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग,वनविभाग आदिसह सर्व शासकीय विभागातील अधिकारी ,कर्मचारी ,तलाठी, शिक्षक ,ग्रामसेवक,पालिका कर्मचारी व पोलीस रॕलीत राष्ट्रध्वज तिरंगा फडकावित सहभागी झाले होते.
रॕलीच्या समोर देशभक्तीपर गीते लावण्यात आल्याने मोठ्या उत्साहात शहरातील प्रमुख मार्गावरुन रॕली काढण्यात आली. रॕली मध्ये विविध विभागातील कर्मचारी यांनी भगवा पाढंरा, हिरवे वेश परिधान करीत सहभागी झाले होते.रॕलीत विविध फलकासह, भारतमातेचा, राष्ट्रप्रेमाचा जयघोष करण्यात आला.शहरातील प्रमुख मार्ग डाॕ.आंबेडकर चौक,छञपती शिवाजी महाराज चौक,गोल्डन चौक,मंगळवार पेठ नगरपालिका,निजामपुरा मोहल्ला,रमाई चौक,महात्मा फुले चौक,नवीन राममंदीर,मंडई चौक,जय भवानी चौक,भवानी शंकर मंदीर,बावची चौक,करमाळा रोड मार्गे जात तहसील कार्यालयात समारोप करण्यात आला.
दरम्यान, जनजागृती रॕलीत तहसिलदार रेणुकादास देवणीकर,नायब तहसिलदार सुजीत वाबळे,पोलीस निरिक्षक सुनिल गिड्डे, सपोनि कविता मुसळे,राजकुमार ससाणे, हिंगे, मुख्याधिकारी मनिषा वडीपल्ले,गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, गटशिक्षणाधिकारी अशोक खुळे आदि सहभागी झाले होते.