जळगाव : अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. मात्र जळगावात महावितरणने पाठवलेल्या विजेच्या बिलांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील निमसरकारी महावितरणकडून प्रकल्प राज्यभरात वीज पुरवठा केला जातो. महावितरणकडून राज्यभरात वीज वितरण आणि वीज बिलांची देयके देण्याचे काम केले जाते. उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद जाऊन तीन वर्षे होत आली आहेत. उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिदे यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रे घेतली. ५ डिसेंबर २०२४ पासून फडणवीस यांच्याकडे ज्याचे नेतृत्व आहे. त्यामुळे आपली चुक सुधारत वीज बीलांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार : आ. चव्हाण
भाजप प्रदेश प्रभारी आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, जे घडले ते योग्य नाही. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहोत. हे चुकून झाले असेल तर ठीक आहे. मात्र जर हेतुपुरस्सर घडत असेल त्तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.