पिंपरी : प्रेम प्रकरणाच्या संशयावरून पाच जणांनी दोन महिलांना मारहाण केली. ही घटना ६ डिसेंबर रोजी सकाळी खराबवाडी येथे घडली असून सोमवारी (दि.९) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आकाश प्रकाश तायडे (वय ३०) आणि इतर चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मारहाण झालेल्या महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या घराशेजारी राहणाऱ्या महिलेचे आणि आरोपी महिलेच्या पतीचे प्रेमसंबंध सुरु असल्याचा आरोपींना संशय होता. त्या कारणावरून आरोपींनी त्या महिलेला आणि फिर्यादीला बेदम मारहाण केली. संबंधित महिला इथे दिसल्यास तुला जिवंत सोडणार नाही, अशी आरोपींनी फिर्यादी महिलेला धमकी दिली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.