पुणे : येरवडा परिसरात पोलिसांनी दोन सराईत गुंडांना अटक केली. आरोपीकडून देशी बनावटीची दोन पिस्तुले जप्त केली. तपासासाठी त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. अनिकेत राजू साठे (वय २१) व आदित्य सतीश घमरे (वय २१, दोघे रा. गाडीतळ, येरवडा) ही आरोपींची नावे आहेत. साठे आणि घमरे सराईत गुंड असून दोघांविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे.
त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने येरवड्यातील गुंजन चित्रपटगृहाजवळ दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तूले, दोन काडतुसे जप्त करण्यात आली.