पुणे : पुणे महापालिकेकडून महंमदवाडीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या भागातील दोन डीपी रस्ते पीपीपी तत्वावर विकसित केली जाणार आहे.
यासाठी प्रस्ताव स्थायी समितीत ठेवण्यात आला आहे. त्यामुळे महंमदवाडीतून हडपसरकडे जाण्यासाठी आणखी एक पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे.
महंमदवाडी स.न. २६ ,२७ आणि ३७ मधील २४ मी. डीपी रस्ता व कलव्हर्ट, व स.न. ३८,४०,४१,५५,५६ मधून जाणारा ३० मी. रुंदीचा डी. पी. रस्ता विकसित करण्याचे २६ कोटी रुपये खर्चून हा रस्ता विकसित केला जाणार आहे.
तसेच या रस्त्यामुळे कोंढवा येऊन वडाचीवाडी येथे जाण्यासाठी नवीन लिंकरोडही उपलब्ध होणार आहे.
तसेच या रस्त्यामुळे कोंढवा येऊन वडाचीवाडी येथे जाण्यासाठी नवीन लिंकरोडही उपलब्ध होणार आहे. तर सर्वे नंबर २६ ते ३६ दरम्यान२४ मीटर रूंदीचा ६०० मीटर लांबीचा आणि तिथून पुढे सर्वे नं ३७ ते ४० दरम्यान, ३०० मीटर रूंदीचा आणि ७२५ मीटर लांबीचा हा रस्ता असणार आहे.
त्यामुळे या रस्त्याने या भागातील कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, महापालिकेकडून शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी डीपी रस्त्यांचे रुंदीकरण तसेच मिसिंग लिंक जोडण्यात येत आहे. त्या अंतर्गत हे रस्ते केले जाणार आहे.
हे रस्ते विकसित झाल्यास वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. यासाठी बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी महापालिका आयुक्तांकडे वारंवार पाठपुरावा केला होता.
तसेच तातडीने हे काम करण्याची मागणीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली.