नवी दिल्ली : सध्या ब्लूटूथ इअरफोन, हेडफोन यांसारखे गॅजेट्स लाँच केले जात आहेत. त्यात आता Truke कंपनी सतत नवनवीन प्रॉडक्ट्स आणत आहे. कंपनीने Truke Yoga Beat ओपन इअर हेडफोन्स नावाने आणखी एक नवीन प्रॉडक्स मार्केटमध्ये आणले आहे. हा हेडफोन तुम्ही तुमच्या गळ्यातही लटकवू शकता. यामध्ये अनेक बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत.
Truke चा Yoga Beat हा बेस्ट असा हेडफोन ठरत आहे. हा तुमचे कान पूर्णपणे झाकत नाही, म्हणून खूप आरामदायक आहे. यासोबतच यामध्ये टायटॅनियमचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे ते मजबूत होते. हा हेडफोन अतिशय हलका आणि सॉफ्ट असा आहे. याशिवाय, हा इअरफोन वापरायलाही खूप छान वाटतो. तुम्ही तो तासन् तास वापरू शकता. तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.
क्लिअर व्हॉईस यामधून मिळू शकतो. यात दोन मायक्रोफोन असून, ज्यामुळे कॉल दरम्यान तुमचा आवाज अगदी स्पष्टपणे ऐकू येऊ शकतो. ह नवीन तंत्रज्ञानाने (ब्लूटूथ 5.4) बनलेले आहे जेणेकरून ते फोनशी पटकन कनेक्ट होते आणि त्याची बॅटरी देखील दीर्घकाळ टिकते. एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे 30 तास टिकू शकतो. या इअरफोनमधून चांगला आणि मोठा आवाज मिळतो. यात चांगले साउंड ड्रायव्हर्स आहेत जे तुम्हाला उत्तम आवाज देतात. यात काही समस्या असल्यास, तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळू शकते.