Trending News : सोलापूर : दीड महिना होत आला तरी पावसाने दांडी मारल्याने सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी ग्रामस्थांनी गाढवांचे लग्न लावून मुसळधार पाऊस पडावे यासाठी वरुण राजाला साकडे घातले आहे. मंगळवारी (ता. ११) दुपारी तीन वाजण्याच्या शुभ मुहूर्तावर मैंदर्गी गावात ग्रामस्थांनी गाढवाचे लग्न लावून गावात वरात काढली. गाढवाच्या या लग्नाला संपूर्ण मैंदर्गीकर ग्रामस्थांनी उपस्थित लावली होती. Trending News
सोलापुरात मात्र पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला तरी संपूर्ण अक्कलकोट तालुक्यात पावसाचा एक थेंब पडला नाही. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची चिंतेत वाढ झाली आहे. संपूर्ण खरीप हंगाम वाया जाणार तर नाही, अशी भीती शेतकऱ्यामध्ये दिसून येत आहे. एखादा मोठा पाऊस पडताच पेरणीला सुरुवात होणार आहे. मात्र पाऊस काय पडण्याचा नावच घेत नाहीये. त्यामुळे ग्रामस्थांनी गाढवाचे लग्न लावून गावात वरात काढली.
अक्कलकोट शहरापासून अगदी काही अंतरावर मैंदर्गी गाव आहे. या गावात अनेक वर्षांपासून गाढवाचे लग्न लावून दिले जाते. पाऊस झाला नाही किंवा दुष्काळी परिस्थिती ओढवली तर मैंदर्गीकर हे गाढवाचे लग्न लावून देतात. गाढवाच्या लग्नाची लग्न पत्रिका देखील छापून आजूबाजूच्या ग्रामस्थांना निमंत्रण दिले जाते. ठरलेल्या तारखेला शुभमुहूर्तावर गावातील वेशीत गाढवाचे लग्न लावून वरात काढली जाते.
दरम्यान, ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू असल्याची माहिती ग्रामस्थ सांगतात. अनेकदा गाढवाच्या लग्नानंतर अक्कलकोट तालुक्यात समाधानकारक पाऊस बरसला आहे. यंदाच्या वर्षी दीड महिना होत आला तरी पावसाने हजेरी लावली नाही, खरिपाच्या पेरण्या थांबल्या आहेत, म्हणून ११ जुलै रोजी दुपारच्या शुभमुहूर्तावर गाढवाचे लग्न लावून देण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात गाढवांची वरात काढून मैंदर्गीकरांनी वरुणराजाकडे मुसळधार पावसासाठी साकडे घातले आहे. Trending News