उरुळी कांचन, (पुणे) : शिंदेवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गायरान परिसरात हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्या हस्ते लक्ष्मितरू वृक्षाचे वृक्षारोपण करून वृक्ष लागवड करण्यात आली.
नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून शाश्वत विकास फाउंडेशन ग्रामपंचायत शिंदेवाडी ग्रामपंचायत हिंगणगाव, कृषी विभाग, महसूल विभाग यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी २५१ वृक्षांचे वृक्षारोपण केले.
यावेळी स्टार महाराष्ट्र न्यूजचे संचालक अशोक घावटे, उपसंपादक राजेंद्र शिंदे, ग्रीन फाउंडेशनचे अध्यक्ष अमित जगताप, मंडलाधिकारी सय्यद मॅडम, शिंदेवाडीचे सरपंच संदीप जगताप, भवरापुरचे सरपंच सचिन सातव, सांगवीचे सरपंच नरसिंग लोले, हिंगणगावच्या सरपंच विद्या सागर थोरात, मंडल कृषी अधिकारी गणेश सुरवसे, कृषी अधिकारी नीलम कासारे, शिंदेवाडीच्या ग्रामसेविका मोनिका माझीरे, हिंगणगावच्या ग्रामसेविका सुवर्णा लोंढे, आर्ट ऑफ लिविंगचे साधक अजित रणसिंग, तलाठी सुधीर जायभाय, प्रदीप जवळकर, निवृत्ती गवारी, शाश्वत विकास फाउंडेशनचे अध्यक्ष प्रभाकर जगताप, सदस्य रघुनाथ हरपळे, विजय थोरात, राहुल थोरात, जयमाला जगताप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, रिमझिम पावसाच्या सरीवर सरी पडत होत्या या पावसाचा आनंद घेत तहसीलदार तृप्ती कोलते पाटील व सर्व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण करण्याचा आनंद घेतला. यावेळी महिलांनी वृक्षांना राखी बांधून वृक्षारोपण केले. वृक्षारोपण कार्यामध्ये अनमोल सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.