पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालकांच्या पत्रान्वये कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी परिक्षेत्रातील २८ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. पुणे जिल्हा ग्रामीणसाठी या बदल्यात ६ पोलिस निरीक्षक बदलून आले आहेत.
२२ जानेवारीला रात्री बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. बदली आदेशानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या पोलिस निरीक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करावे, तसेच बदली झालेल्या अधिका-यांना तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश फुलारी यांनी दिले आहेत.
बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे पुढीलप्रमाणे (कोठून- कुठे) :
कोल्हापूर ते सांगली : संदीप रंगनाथ कोळेकर
कोल्हापूर ते सातारा : राजेंद्र सदाशिव सावंत्रे, अविनाश भुपाल कवठेकर, राजेंद्र बापू मस्के, अरविंद रंगनाथ काळे
कोल्हापूर ते सांगली : भैरू अंतु तळेकर, प्रकाश दामोदार गायकवाड, ईश्वर दौलतराव ओमासे
कोल्हापूर ते पुणे ग्रामीण : संतोष श्रीमंत घोळवे
सांगली ते कोल्हापूर : शिवाजी मारुती गायकवाड
सांगली ते पुणे ग्रामीण : नारायण शिवाजी देशमुख
सांगली ते सातारा : जितेंद्र प्रभाकर शहाणे
सातारा ते सांगली : संदीप किसनराव भागवत
सातारा ते पुणे ग्रामीण : नवनाथ कोंडिबा मदने
सातारा ते कोल्हापूर : निंगाप्पा रंगप्पा चौखंडे, महेश किसनराव इंगळे
पुणे ग्रामीण ते कोल्हापूर : विलास शामराव भोसले, सचिन दिनकर पाटील, दिलीप शिशुपाल पवार
पुणे ग्रामीण ते सातारा : यशवंत कृष्णा नलावडे
पुणे ग्रामीण ते सोलापूर ग्रामीण : संजय शंकर जगताप, नारायण विनायकराव पवार
पुणे ग्रामीण ते सांगली : महेश कृष्णराव ढवाण
सोलापूर ग्रामीण ते सांगली : विनय रामचंद्र बहिर
सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण : दीपरतन गोरख गायकवाड, गोरख कृष्णा गायकवाड व अरुण ज्ञानदेव फुगे
सोलापूर ग्रामीण ते कोल्हापूर : अशोक गुलाब सायकर