पुणे : नववर्षारंभाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी पुणे कॅम्प (लष्कर), डेक्कन व शिवाजीनगर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होते. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी ३१ डिसेंबरच्या सायंकाळी पाच वाजल्यापासून गर्दी कमी होईपर्यंत प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीत बदल केला आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.
असे असतील वाहतुकीत बदल?
- कॅम्प भागातील महात्मा गांधी रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाय जंक्शनवरून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक ही १५ ऑगस्ट चौक येथे बंद करून ती कुरेशी मस्जिद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे.
- इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक ही बंद करण्यात येणार आहे.
व्होल्गा चौकाकडून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून, ही सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल. - तसेच इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून, ही वाहतूक इंदिरा गांधी चौकातून लष्कर पोलिस स्टेशन चौकाकडे वळविण्यात येईल.
- पुढे सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून, ही वाहतूक ताबूत स्ट्रीटमार्गे पुढे सोडण्यात येईल.
फर्ग्युसन कॉलेज रोड व जंगली महाराज रस्ता
- शहरातील फर्ग्युसन कॉलेज रस्ता, कोथरूड/कर्वे रस्त्याकडून येणारी वाहतूक खंडोजीबाबा चौक या ठिकाणी बंद करून लॉ कॉलेज रस्ता, प्रभात रस्ता व अलका टॉकीज चौकमार्गे वळविण्यात येईल.
- जंगली महाराज रस्त्याने खंडोजीबाबा चौक, गुडलक चौक व इतर बोळांमधून फर्ग्युसन कॉलेज रस्त्याकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेप्रमाणे झाशी राणी चौक या ठिकाणी बंद करून पुणे महानगरपालिका, ओंकारेश्वर मंदिर व शिवाजी रस्ता यामार्गे वळविण्यात येईल.
या ठिकाणी वाहने लावण्यास बंदी
३१ डिसेंबरपासून पहाटे पाच वाजेपर्यंत) गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज मुख्यद्वारापर्यंत. महात्मा गांधी रस्ता १५ ऑगस्ट चौक ते हॉटेल अरोरा टॉवर येथे वाहने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे.