पालघर : येथील जव्हार तालुक्यातील बारमाही वाहणारा दाभोसा धबधबा (Dabhosa Falls) हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. परंतु रविवारी दुपारी तेथे एक भयानक घटना घडली आहे. दाभोसा धबधब्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांनी १२० फुटावरून पाण्यात उडी घेतली. यात दुर्दैवाने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
यावेळी दोन्हीही मित्रांनी डोहात एकत्र उडी घेतली. परंतु यावेळी दुसरा मित्र वर आलाच नाही. माज शेख असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मिरा-भाईंदर येथील रहिवासी आहे. तो मित्र पाण्यात बुडाला. त्याशिवाय, दुसरा मित्र वर आला, पण तोही गंभीर जखमी झाला होता. तर जोएफ शेख असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्या कमरेला, पायाला आणि मानेला जबर मार लागला आहे. जोएफला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबरोबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघर (Palghar) जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात असलेल्या दाभोसा धबधब्याजवळ मिरा-भाईंदर येथे राहणारे तीन तरुण रविवारी आले होते. कदाचीत ते तिघेजण नवखे असल्यामुळे त्यांना डोहातील पाण्याचा आणि डोहाच्या खोलीचा अंदाज आला नव्हता. तिघांपैकी दोन तरुणांनी धबधबा सुरू होतो तेथून थेट पाण्यात उडी घेतली. तिसरा तरुण त्यांचा व्हिडीओ काढत होता. ही घटना लक्षात येताच तिसऱ्या तरूणाने आजुबाजूला पाहून आरडाओरडा केला. त्यानंतर काही स्थानिकांनी धबधब्यावर धाव घेऊन जोएफला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
होडातील पाण्याचा अंदाज आला नसल्यामुळे तसेच, डोहाची खोली न जाणता, पोहण्याची क्षमती कमी असतानाही उंचावरून उडी घेतल्याने तरुणाचा जागच्या जागीच मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांना सावध राहून पर्यटनाचा आनंद घेणे गरजेचे आहे.