सुरेश घाडगे
परंडा : तालुक्यातील श्रीक्षेत्र सोनारी व कंडारी येथील काळभैरवनाथ यांचा जन्मोत्सव सोहळा कार्तिक वद्य अष्टमी, बुधवार ता. १६ रोजी होणार असून यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार असून सोनारी येथे श्रीकाळभैरवनाथ जन्मोत्सवानिमित्त सकाळी १० वाजता वृक्षारोपण, रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आपले आहे .
सकाळी साडेदहा वाजता हभप डॉ. जयवंत भोसले महाराज यांचे किर्तन, सायंकाळी ६ वाजता हभप सौ. अपर्णा नागेश सहस्रबुद्धे सोलापूर यांचा भारुडाचा कार्यक्रम, रात्री ९ वाजता हभप राधा सानप यांचे सुश्राव्य किर्तन व रात्री १२ वाजता श्रीचा पाळणा (जन्मोत्सव) व महाआरती आदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
तरी या सोहळ्यास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समीर पुजारी महाराज यांनी केले आहे.
तसेच तालुक्यातील श्रीक्षेत्र कंडारी नगरीतील श्रीकाळभैरवनाथ जन्माष्टमी निमित्त बुधवार (दि. १६) रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रात्री ९ वाजता किर्तनकार ह.भ.प. वैजीनाथ थोरात महाराज हिंगोलीकर यांचे कीर्तन होणार आहे .गायनाचार्य ह.भ.प. अंगद ढोले (घोडेगावकर),गायनाचार्य ह.भ.प. दत्ता चव्हाण आळंदीकर आहेत .जन्मोत्सव सोहळा रात्री १२:०० वाजता साजरा होणार आहे.