tomato lost in space : मुंबई: अंतराळात हे नेहमी आपल्याला आश्चर्यचकित करत असते. आता त्यात भर घालण्यासाठी आणखी एक गोष्ट समोर आली आहे. तब्बल आठ वर्षांपूर्वी हरवलेला टॉमेटोचा तुकडा आता सापला आहे.२०२३ च्या सुरूवातीला अमेरिकन अंतराळवीर फ्रान्सिस्को फ्रँक रुबियो यांनी मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये टोमॅटो वाढवण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वीही झाला. २९ मार्च २०२३ मार्चमध्ये अंतराळात पिकवलेल्या टोमॅटोची काढणी सुरू असताना एक टोमॅटो हरवला होता.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर तैनात असलेल्या अंतराळवीर फ्रँक रुबिओ यांच्याकडून तो टोमॅटोचा तुकडा बेपत्ता झाले होते. तो मिळाल्याची माहिती आता त्यांचे क्रू मेंबर्स अंतराळवीर जास्मिन मोघबेली यांनी सांगितली. तेव्हापासून टॉमेटोच्या तुकड्याचे अंतराळवीर शोध घेत होते. आता आठ महिन्यांनंतर टोमॅटोचा काही भाग तेथे तैनात असलेल्या क्रू मेंबर्सना मिळाला आहे.
२९ मार्च २०२३ ला या टोमॅटोची काढणी करण्यात आली आणि ते टोमॅटो अंतराळवीरांना नमुने म्हणून देण्यात आले. यात फ्रँक रुबिओलाही त्याचा काही भाग प्लास्टिकच्या पिशवीत देण्यात आला होता. आणि सर्वांना तो खायचा होता. रुबिओ हा १ इंचाचा टोमॅटो खाणार होता. मात्र, त्यापूर्वीच तो स्पेस स्टेशनमध्ये हरवला. त्यावेळी रुबिओची खूप खिल्ली उडवली गेली होती. त्याला दोषीही ठरवण्यात आले होते.
Space.com च्या रिपोर्टनुसार, अंतराळवीर जास्मिन मोघबेलीने व्हिडिओ शेअर करत सांगितले की, आमचा चांगला मित्र फ्रँक रुबिओ घरी गेला आहे. टोमॅटो खाल्ल्यासाठी त्याला बऱ्याच काळापासून दोष दिला जात होता. पण आता आपण त्याला दोषमुक्त करू शकतो. अखेर आम्हाला तो हरवलेला टोमॅटो मिळाला आहे. क्रू मेंबर्सनी त्याची माफीही मागितली आहे.