(Toll Price Hike) पुणे : मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांच्या आता खिशाला झळ बसणार आहे. कारण आकारण्यात येणाऱ्या टोलच्या दरात (Toll Price Hike) आता वाढ केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. टोलसाठी आता तब्बल १८ टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.
टोलची दरवाढ येत्या १ एप्रील २०२३ पासून होणार आहे. बांधकाम विभागाकडून मुंबई पुणे महामार्गाच्या टोलमध्ये दर तीन वर्षांनी १८ टक्के वाढ करण्याबद्दल २००४ साली अधिसूचना काढली होती. या अधिसूचनेनुसार २०२३ मधील टोलवाढ करण्यात आली आहे. यापूर्वी १ एप्रिल २०२० मध्ये वाढ झाली होती. आता या दरवाढीबद्दल एमएसआरडीसी कडून माहिती देण्यात आली आहे.
‘मुंबई-पुणे महामार्गावर प्रवाशांची संख्या मोठी आहे. मुख्य दोन शहरांना जोडणार हा महामार्ग असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे नागरिकांना सतत वाहतुक कोंडीला देखील समोरे जावे लागते. तसेच मोठे अपघात झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे महामार्गावर उपाय योजना करणे आवश्यक असताना टोल वाढविला जाणार असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता प्रवाशांना तब्बल ५० ते ७० रुपये इतका टोल जास्त द्यावा लागणार आहे.
किती द्यावा लागेल टोल
– कारचा टोल 270 रुपयांवरून 316 रुपये होणार आहे.
– बससाठी 795 रुपयांएवजी 940 रुपय द्यावे लागणार आहेत.
– ट्रकसाठी सध्या 580 रुपये द्यावे लागतात मात्र यापुढे वाहन चालकांना 685 रुपये द्यावे लागतील.
– टेम्पोसाठी 420 रुपयांऐवजी 495 रुपये इतका टोल द्यावा लागणार आहे.
– थ्री एक्सेल साठी १३८० रुपयांएवजी १६३० रुपये तर एम एक्सेलसाठी १८ ३५ रुपयांएवजी २१६५ रुपये द्यावे लागणार