पुणे : पंचांगानुसार आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशी भविष्यजाणून घ्या.
मेष
मेष राशीच्या लोकांनो आज गोड बोलून आणि वागून इतरांची मने जिंकून घेतली, तर चांगल्यापैकी प्रगती कराल
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांनो आज पापड खाद्यपदार्थ चैनीच्या वस्तू यांच्या व्यापारात चांगला पैसा मिळेल
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांनो आज भाग्याची साथ चांगली मिळून, आपल्या हक्कांना बाधा न आणता स्वतःचे हित साधून घ्याल
कर्क
कर्क राशीच्या लोकांनो आज महिला आपले आवडते छंद जोपासतील भाग्य उजळेल .
सिंह
सिंह राशीच्या लोकांनो आज स्थावर इस्टेटिसंबंधी अडकलेली कामे मार्गी लागतील, त्यापासून लाभही मिळेल
कन्या
कन्या राशीच्या लोकांनो आज आर्थिक आणि सामाजिक दर्जा प्राप्त होईल, साध्या प्रत पोचण्यासाठी एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा जबरदस्त कराल
तूळ
तूळ राशीच्या लोकांनो आज अत्यंत व्यवहाराने वागाल, तुमचे अस्तित्व जगाला दाखवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा कराल
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी, सत्ता आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न कराल
धनु
धनु राशीच्या लोकांनो आज उच्च अधिकार मिळवाल, कलेतून पैसा मिळेल
मकर
मकर राशीच्या लोकांनो आज घरामध्ये एखादी गोष्ट पटवून देण्यात यशस्वी व्हाल, महिला बुद्धीच्या जोरावर पुढे जातील
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांनो आज स्वतः काम न करता, इतरांकडून कामे करून घेण्यात यशस्वी व्हाल,
मीन
मीन राशीच्या लोकांनो आज मनासारखे झाले नाही, तर रागाचा पारा ताबडतोब चढेल,