पुणे : पंचांगानुसार,आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष
मेष राशीसाठी आज वडिलोपार्जित इस्टेटसंबंधी वाद टोकाला जाऊ शकतात, अचानक खर्च समोर आल्यामुळे थोडी धांदल उडेल.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांनो आज पैशाची जमवाजमा करण्यासाठी जास्त कष्ट पडतील, कर्ज-रक्कम आज न घेतलेली बरी
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांनो आज आर्थिक मोहाच्या क्षणांपासून सावधानता वाळवा, नाहीतर पुढे होत्या येण्याची शक्यता आहे,
कर्क
कर्क राशीच्या लोकांनो आज कोर्ट दरबारी संघर्ष जास्त वाढतील, मानापमानाच्या कल्पनांमुळे हातातील संधीचा फायदा करून घेणार नाही
सिंह
सिंह राशीच्या लोकांनो आज खाण्यापिण्यावर बंधन ठेवले नाही, तर पोटाचा आजार अपचन होण्याची शक्यता आहे
कन्या
कन्या राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांच्या अभ्यासामागे जास्त कष्ट घ्यावे लागतील, त्यांच्यामागे दिवस जाईल.
तूळ
तूळ राशीच्या लोकांनो आज महिलांना घरगुती बाबतीत तडजड करावी लागेल, आज इच्छाशक्ती चांगली ठेवा, यश मिळेल
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज राहती जागा बदलायची असेल, तर अवश्य प्रयत्न करावेत, काही भाग्यकारक घटना घडतील
धनु
धनु राशीच्या लोकांनो आज खूप दिवसांपासून अडलेली कामे मार्गी लागतील, अति भावनाप्रधानतेमुळे नुकसान होईल
मकर
मकर राशीच्या लोकांनो आज भावंडांनी दिलेल्या सर्व प्रस्तावाला मान्यता दिलीच पाहिजे असे नाही, स्वतःच्या मनाचा कौल सर्वात महत्त्वाचा ठरेल
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांनो आज आर्थिक स्थिती सुधारेल, वडिलांची थोडे मतभेद संभवतात
मीन
मीन राशीच्या लोकांनो आज घरात एखादी मंगल कार्य ठरेल, नातेवाईकांच्या सहवासात काय उत्तम जाईल.