पुणे : पंचांगानुसार, आजचा दिवस कोणत्या राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष
आज दिवस थोडा संघर्षमय जाईल, नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात
वृषभ
आज वाहने जपून चालवा ठरवलेल्या कामाबद्दल शांतपणे बसून विचार करणे गरजेचे ठरेल
मिथुन
आज छोट्या छोट्या घातक सवयी बदलल्या, तर भरपूर काम करू शकाल, महिलांनी त्यांचा दृष्टिकोन बदलावा.
कर्क
आज भूतकाळातील मिळालेल्या अपयशात गुंतून पडलात, तर प्रगती होणार नाही तरुणांचे विवाह ठरतील
सिंह
आज पूर्वी केलेले आर्थिक नियोजन आता उपयोगी पडेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल.
कन्या
आज समोरच्या माणसाचा चढलेला पारा कसा खाली आणायचा, याचे चातुर्य तुमच्याकडे असल्यामुळे इतरांची मने जिंकाल.
तूळ
आज लांबच्या प्रवासाचे योग येतील, आर्थिक नियोजनांमध्ये तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची आवश्यकता राहील
वृश्चिक
आज मित्रांबरोबर सहलीच्या बेत ठरवाल, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल
धनु
आज खाण्यावर बंधन पाळायला हवे नाहीतर पचनशक्ती बिघडेल, वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घेतल्यामुळे सौख्य लाभेल
मकर
आज वागण्यामध्ये चैनीला महत्त्व द्याल, नोकरी व्यवसायात स्त्रियांच्या मध्यस्थीने कामे होतील
कुंभ
आज गायन वादन अभिनय नृत्य यासारख्या कलांमध्ये प्राविण्य मिळेल, महिलांना आर्थिक लाभ कमी होतील
मीन
आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे थोडा मानसिक ताण राहील, परंतु भाग्याची साथ असल्यामुळे कोणत्याही टोकाच्या गोष्टी घडणार नाहीत