पुणे : आजचा दिवस पंचांगानुसार कृष्ण पक्ष षष्ठी, मूळ नक्षत्र, हर्षण योग, आणि गुरुवार या ग्रहस्थितींमुळे महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणारा असेल. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या बारा राशींची राशिभविष्य सविस्तर..
मेष
महत्त्वाचे निर्णय घेताना धीर धरा, कोणत्याही घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. सहकाऱ्यांसोबत समन्वय ठेवा.
वृषभ
नवीन संधी हाताशी येतील, त्याचा उपयोग करा. जुनी प्रकरणे सोडवण्यासाठी हा दिवस अनुकूल आहे.
मिथुन
व्यावसायिक क्षेत्रात नवीन प्रकल्प हाती घेण्याची संधी मिळेल. लहान प्रवास फायद्याचे ठरू शकतात.
कर्क
जुन्या कामांमध्ये सुधारणा करावी लागेल. सहकाऱ्यांचे मत विचारात घ्या.
सिंह
नेतृत्वगुणांना वाव द्या, महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागेल पैशांचा वापर जपून करा, भविष्यासाठी बचत करणे महत्त्वाचे ठरेल.
कन्या
परिश्रमाचे योग्य फळ मिळेल, मात्र संयम ठेवा.आर्थिक नियोजन आवश्यक आहे, अनावश्यक खर्च टाळा.
तूळ
नवीन संधी मिळतील, परंतु त्यांचा योग्य उपयोग करावा लागेल.गुंतवणुकीत फायदा होईल, पण योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या.
वृश्चिक
नव्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची वेळ आली आहे.धनलाभाची संधी आहे, परंतु हुशारीने निर्णय घ्या.
धनु
नवीन कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे. जुनी येणी वसूल होतील, खर्च नियंत्रीत ठेवा.
मकर
करिअर आणि व्यवसाय: कष्टाचे चीज होईल, सहकाऱ्यांशी सहकार्य ठेवा.
.
कुंभ
गुंतवणुकीसाठी अनुकूल वेळ आहे. घरात सकारात्मक ऊर्जा असेल.
मीन
संयम ठेवा, लवकरच यश मिळेल.: खर्चावर नियंत्रण ठेवा.