शिक्रापूर, (पुणे) : भगवान श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं विचार हे सुसंस्कृत व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी दिशादर्शक आहेत. म्हणून आजच्या धावपळीच्या युगात प्रस्तुत विचारधारा ही आमची धर्मसंस्कृती टिकविण्यासाठीही अत्यावश्यक आहे असे मोलाचे विवेचन आपल्या प्रवचनात करताना त्यांनी समाजात मंदिर का आवश्यक आहेत याचेही विस्तृत विवेचन महानुभाव संप्रदायातील सुप्रसिद्ध व्याख्याते महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त भागवताचार्य आचार्य प्रवर महंत बाभूळगावकर बाबाशास्त्री यांनी केले.
श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रम शिक्रापूर ३८ वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने बाभुळगावकर शास्त्री बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रम शिक्रापूरचे संचालक महंत कृष्णराज बाबा शास्त्री यांनी केले होते.
याप्रसंगी महंत पातूरकर बाबा शास्त्री, महंत निमजकर बाबा, महंत गौळणकर बाबा, महंत मुरारीमल्ल बाबा, महंत हंसराज बाबा, अमृतराज शास्त्री, मुरलीधरबाबा, महेंद्र पंजाबी, दत्तात्रय कांचन, बाबासाहेब सरडे, मोहन कदम, अतुल सावंत आदी संत महंत तपस्वीनी तथा परिसरातील सदभक्त मंडळींची लक्षणीय उपस्थिती होती. संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पु.अनिलदादा मराठे यांनी केले. प्रास्ताविक कीर्तनकार रमेशराज पातुरकर यांनी केले तथा आभार कृष्ण मंदिर महानुभाव आश्रम शिक्रापूर संचालक महंत कृष्णराज बाबा शास्त्री यांनी मानले.