पुणे : जुन्नूर तालुक्यातील उदापूर येथील शेतक-याने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी दुपारच्या दरम्यान घडली.
प्रकाश (पप्पू) दत्तात्रय सस्ते (वय-33 रा. उदापूर ता. जुन्नर) असे मृत शेतक-याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश सस्ते हा अल्पभूधारक शेतकरी होता. त्यांना एक एकर शेती होती. याबरोबरच ते पशुपालन करुन दुधाचा व्यवसाय ही करायचा. सस्ते हे त्यांच्या शेतीसाठी आणि दुधाचा व्यवसाय करण्यासाठी जमिनीवर पतसंस्थाकडून कर्ज घेतले होते. गेल्या काही महिन्यापासून दुधाचे दर ही कोसळले असल्याने त्यांचे आर्थिक गणित चूकत होते त्यामुळे त्यांनी अठरा गाईपैकी दहा गाई विकल्या. मात्र तरीही कर्जाचा बोजा वाढतच होचा. त्यामुळे आपल्या कुटुंबाचे कसे होणार ही चिंता त्यांना सतावत होती. यामुळे सस्ते तणावात जाऊन त्यांनी घराजवळील चिक्कूच्या झाडाला दोरीच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती शेतक-याचा भाऊ निखील सस्ते यांनी माहिती दिली. तसेच घटनेसंदर्भात ओतूर पोलीसांना माहिती देण्यात आली त्यावेळी पोलीसांनी आकस्मित मयत म्हणून नोंद केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.