रांजणगाव गणपती : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी तरुण संतोष सुभाष चौधरी याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी शिक्रापुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, निमगाव म्हाळुंगी येथील नवनाथ शिवाजी भोरडे याने शिक्रापुर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली होती. दिलेली फिर्याद मिटवून घेऊ म्हणून नवनाथ भोरडे याचा मोठा भाऊ सुरेश भोरडे यांने संतोष सुभाष चौधरी यास फोन करुन घरी बोलावून घेतले आणि त्याला सर्वांनी बेदम मारहाण केली, शिवीगाळ दमदाटी करून चांगलाच दम दिला.
त्यानंतर घाबरलेल्या आणि दहशतीखाली सापडलेल्या संतोष चौधरी व त्याचे कुटुंबातील सदस्य मानसिक दबावत होते, सततच्या धमकी मुळे दहशतीखाली येऊन, घाबरुन जाऊन भितीमुळे संतोष याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत ही घटना कुटुंबातील सदस्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संतोष चौधरी याला पुणे येथील ससुन सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान संतोष चौधरी यांचा मृत्यू झाला, या घटनेबाबत संतोष चौधरी यांचे भाऊ सचिन सुभाष चौधरी यांनी संतोष यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी शिक्रापूर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानुसार 1) नवनाथ शिवाजी भोरडे, 2) सुरेश शिवाजी भोरडे, 3 )बाळू शिवाजी भोरडे, 4 )कोयना नवनाथ भोरडे, 5 )सुरेश भोरडे याची पत्नी, 6) बाळू शिवाजी भोरडे याची पत्नी असे सहा जनांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश पवार, पो. ह. किशोर तेलंग पो.ना. अमोल नलगे हे पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करत असताना अजून तिन आरोपींचा सहभाग या गुन्ह्यात असलेचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सदरच्या गुन्ह्यात एकूण नऊ आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (सर्व रा.हे निमगाव म्हाळुंगी ता.शिरुर जि पुणे ),
यासंदर्भात गुन्हा दाखल केला असून तपासात घटना निष्पन्न होत असताना देखील शिक्रापूर पोलिस स्टेशन चे अधिकारी संबंधित गुन्ह्यातील आरोपींना अटक करत नाहीत. शिक्रापूर पोलिस गुन्ह्यातील आरोपींना अटक कधी करणार.? या बाबत ग्रामस्थांमध्ये उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. तरी देखील संतोष चौधरी यांच्या मृत्यूनंतर पोलिस आरोपींना अटक करुन संतोषला नक्कीच न्याय मिळवून देतील या आशेने स्थानिकांचे मनोधैर्य बळावत आहे.