सोलापूर : सोलापूर आणि पंढरपुरात आयकर विभागाने २५ ते २७ ऑगस्टपर्यंत सलग तीन दिवस धाडी टाकली आहेत. या धाडीसत्रातआयकर विभागाने सोलापूर शहरातील कॉर्डियोलॉजिस्ट डॉ. गुरुनाथ परळे, डॉ. अनुपम शहा, अश्विनी हॉस्पिटलचे संचालक बिपीन पटेल, अश्विनी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज आणि मेहुल कन्स्ट्रक्शनचे मेहुल पटेल, रघोजी किडनी हॉस्पिटलचे विजय घोजी आणि पंढरपूर येथील साखर कारखानदार अभिजित पाटील यांच्या कार्यालयाची कसून तपासणी केली आहे.
काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या बिपीन पटेल व मेहुल कन्स्ट्रक्शनचे मेहुल पटेल यांची मात्र कसून कसून तपासणी करण्यात आली. सोलापूर शहरातील सात रस्ता येथे अश्विनी हॉस्पिटल व कुंभारी येथे असलेल्या अश्विनी मेडिकल कॉलेजशी संबंधित असलेल्या डॉ. अनुपम शहा, डॉ. गुरुनाथ परळे यांची देखील तपासणी करण्यात आली. इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांच्या रडारवर अश्विनी हॉस्पिटल व त्या संबंधित असलेल्यांची चौकशी करून काही कागदपत्रे घेतली आहेत.
याबाबत बोलताना अश्विनी हॉस्पिटलमधील कॉर्डियोलॉजिस्ट डॉ. गुरुनाथ परळे म्हणाले कि, अश्विनी हॉस्पिटलमध्ये माझी काय पोस्ट आहे. त्याठिकाणहून मिळत असलेल्या मानधनाबाबत चौकशी करण्यात आली. माझे बँक खाते किंवा बँकेतील लॉकर सील झालेले नाही. काहीही आक्षेपार्ह माझ्या हॉस्पिटलमध्ये मिळाले नाही. काही बाबतीत लेखी उत्तरे इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी मागितली आहेत. ते आम्ही देऊ. असे सांगितले आहे.
दरम्यान, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईमध्ये एकूण जप्त मालमत्ता जप्त संपत्ती, बँक अकाउंट याबाबतची कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही. या कारवाईनंतर शनिवारी रात्री इन्कम टॅक्स अधिकारी कारवाई संपवून परत पुण्याकडे गेले आहेत.