पुणे : अमेरिकेमध्ये स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्यांना पुरस्कार दिले जातात. महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या साहित्य व समाजकार्य पुरस्कारांची घोषणा सोमवारी करण्यात आली. एकूण अकरा पुरस्कार यंदा दिले जाणार आहेत.
ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. मासूम संस्था आणि साधना ट्रस्ट यांच्यातर्फे २८ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता टिळक स्मारक मंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
साहित्य पुरस्कार –
रंगनाथ पठारे – साहित्य जीवन गौरव पुरस्कार (दोन लाख रुपये व स्मृतीचिन्ह)
राजन गवस – वाङ्मयप्रकार पुरस्कार (कथा आणि कादंबरी) (एक लाख रुपये व स्मृतीचिन्ह)
सोनाली नवांगुळ – अनुवाद आणि लेखन क्षेत्रातील कार्यासाठी विशेष पुरस्कार (एक लाख रुपये व स्मृतीचिन्ह)
समाजकार्य विशेष पुरस्कार –
शांताराम पंदेरे – दलित आणि भूमिहीनांच्या हक्कासाठी केलेल्या कार्यासाठी
प्रमोद झिंजाडे – विधवा प्रथा निर्मूलनाच्या संदर्भात केलेल्या कार्यासाठी
(प्रत्येकी एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह)
डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार –
‘ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क’ (नवी दिल्ली)
(एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह)
ग्रंथ आणि नाट्यलेखन पुरस्कार –
अनिल साबळे – ललित ग्रंथ पुरस्कार
शरद बाविस्कर – अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार
संदेश कुलकर्णी – रा. शं. दातार नाट्यलेखन पुरस्कार
(तिन्ही पुरस्कारांचे स्वरूप हे प्रत्येकी पन्नास हजार रुपये व स्मृतिचिन्ह)
कार्यकर्ता पुरस्कार –
कुमारीबाई जमकातन – संघर्ष पुरस्कार
नंदिनी जाधव – प्रबोधन पुरस्कार
(प्रत्येकी पन्नास हजार रुपये व स्मृतिचिन्ह)