पुणे प्राईम न्यूज डेस्क: चॅम्पियन्स ट्रॉफी टुर्नामेंट स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. या टुर्नामेंटसाठी 12 जानेवारी ही टीमची घोषणा करण्याची शेवटची तारीख आहे. या आय सी सी टुर्नामेंटसाठी भारतीय टीमची घोषणा लवकरच होण्याचे संकेत आहेत. पण कुठल्या खेळाडूंना संधी मिळणार हे पाहावे लागणार आहे?. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या एका खेळाडूसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे. 5 टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत त्याने 1341 धावा केल्या आहेत. या खेळाडूच नाव आहे श्रेयस अय्यर असं आहे. या आधी दुखापत आणि खराब कामगिरीचा सामना त्याला करावा लागला होता. पण देशांतर्गत सीजन 2024-25 मध्ये त्याने जबरदस्त प्रदर्शन केलं आहे.
व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यर..
व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यर टीम इंडियाचा फर्स्टच लाइनमधला खेळाडू आहे. सध्या तो ज्या फॉर्ममध्ये आहे, ते पाहता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी त्याची टीम इंडियात निवड पक्की मानली जात आहे. श्रेयस अय्यर सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत आहे. या स्पर्धेत त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली आहे.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये 325 धावा ठोकल्या
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत श्रेयस अय्यरने आतापर्यंत एकूण पाच सामन्यात पाच डावात 325 च्या सरासरीने 325 धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान त्याने 2 शतकं झळकावण्याचा विक्रम केला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये 137 त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
रणजी ट्रॉफी स्पर्धेत दुहेरी शतक
याबरोबरच अन्य स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये सुद्धा श्रेयस अय्यरची अशीच कामगिरी पाहायला मिळाली आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत चार सामन्यात पाच इनिंगमध्ये 90.40 च्या सरासरीने त्याने 452 धावा फटकावल्या आहेत. यात दोन शतकं लगावली आहेत. या दोन शतकांमध्ये एक दुहेरी शतक लगावलं आहे.
सैय्यद मुश्ताक अली टूर्नामेंटमध्ये 8 इनिंगमध्ये 345 रन्स फटकावले
रणजी शिवाय सैय्यद मुश्ताक अली टूर्नामेंटमध्ये 8 इनिंगमध्ये त्याने 188.52 च्या स्ट्राइक रेटने 345 धावा फटकावल्या आहेत. या दरम्यान एक शतक आणि एक अर्धशतक झळकावलं आहे. श्रेयस अय्यरने दुलीप ट्रॉफी स्पर्धेत 3 सामन्यात 154 धावा, इराणी ट्रॉफीच्या एक मॅचमध्ये 65 धावा केल्या आहेत. त्याला या दोन्ही टुर्नामेंटमध्ये शतक झळकावता आली नाहीत मात्र कामगिरी उत्तम राहिली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत निवड होण्यासाठी प्रबळ दावेदार
देशांतर्गत क्रिकेटमधील या पाच स्पर्धांमधील श्रेयस अय्यरच्या एकत्र धावा जोडल्या तर एकूण टोटल 1341 धावा होतात. ही संख्या आणखी वाढू शकते. कारण श्रेयस, विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत आहे. विजय हजारे ट्रॉफी व्हाइट बॉल टुर्नामेंट आहे. या स्पर्धेतील त्याची कामगिरी पाहिली, तर तो 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत निवड होण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे.