नवी दिल्ली : सध्या WhatsApp युजर्सची संख्या वाढताना दिसत आहे. त्यानुसार, कंपनीकडून अनेक नवनवीन फिचर्स आणण्याचा प्रयत्न असतो. असे असताना आता WhatsApp मध्ये एक भन्नाट फीचर येतंय. त्यामुळे अँड्रॉईड युजर्सना मोठा फायदा होणार आहे.
सध्या हे फीचर बीटा व्हर्जनसाठी सुरु करण्यात आले आहे. लवकरच अँड्रॉईड युजर्सनाही याचा वापर करता येणार आहे. याबाबतची माहिती WABetaInfo ने दिली आहे. WhatsApp च्या या फीचरचे नाव Album Picker असे आहे. या फीचरच्या माध्यमातून अँड्रॉईड युजर्सना कोणालाही फोटो आणि व्हिडिओ पाठवणे सोपे होईल. WhatsApp च्या या नवीन फीचरची चाचणी अँड्रॉइडच्या बीटा व्हर्जन 2.23.20.20 वर केली जात आहे. iOS साठी या फीचरबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आली नाही.
या नवीन अपडेटनंतर WhatsApp च्या गॅलरीचा इंटरफेस बदललेला दिसणार आहे. नवीन अपडेटनंतर, एखाद्या युजरला फोटो किंवा व्हिडिओ पाठवणे सोपे होणार आहे. हे फीचर आल्यानंतर व्हॉट्सॲपची फोटो गॅलरी छोट्या विंडोमध्ये दिसेल.