सुरेश घाडगे
परंडा : आयान मल्टीट्रेड एल.एल.पी. संचलित बाणगंगा सहकारी साखर कारखान्याकडे गाळप हंगाम २०२१-२२ करिता गाळपास आलेल्या ऊस उत्पादक शेतकरी यांच्या बँक खात्यावर अंतिम दर प्र.मे.टन रक्कम रु २०१/- प्रमाणे तिसरा हप्ता जमा केला असल्याची माहीती कारखाना प्रशासनाने प्रसिद्वीपत्रकाद्वारे दिली. यामुळे गत गळीत हंगामात या कारखान्याचा २४५१ परंडा विधानसभा मतदार संघातील उच्चांकी दर ठरला आहे. ऊस उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे .
आयान-बाणगंगा या साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२१-२०२२ मध्ये ५४५३०३.४९५ मे टन ऊसाचे गाळप केले असुन गाळपास आलेल्या ऊसासाठी पहिला हप्ता प्रति मे टन रु . २१०० प्रमाणे व दुसरा हप्ता प्र.मे.टन रु . १५० या पुर्वीच सबंधित ऊस उत्पादक शेतकरी यांच्या खात्यात वेळेत जमा केलेला आहे. तसेच विजयादशमी व दीपावली सणाचे औचित्य साधुन अंतिम दराचा तिसरा हप्ता प्र.मे.टन रु . २०१ प्रमाणे ऊस ऊत्पादक शेतकरी यांचे भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक शाखा परंडा व भुम या शाखेत ऊस उत्पादक शेतकरी यांचे बँक खातेवर तसेच ईतर विभागातील शेतकरी यांनी दिलेल्या बँक खातेवर जमा केलेला आहे.
आयान- बाणगंगा साखर कारखान्याने हंगाम २०२१ -२०२२ मध्ये प्र.मे.टन रु . २४५१ प्रमाणे एकुण अंतिम दर दिलेला आहे. तसेच कारखान्याचा २०२२-२०२३ चा गाळप हंगाम पुढील महिन्यात सुरू होणार असुन याकरिता कारखान्यांचे तोडणी वाहतुकीचे करार पूर्ण झाले असुन गाळप हंगाम सुरू करण्याच्या द्रुष्टीने कारखाना दुरुस्तीची सर्व कामे पुर्ण झालेली आहेत. गेल्या चार वर्षापासुन कारखान्याकडे असणाऱ्या वजन काट्याबाबत ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतुक ठेकेदार यांच्याकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असुन कारखान्याच्या काट्याबाबत वाहतुकदार व शेतकरी यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही.
कारखान्याने गेल्या चार वर्षांपासून ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतुक ठेकेदार, व कर्मचारी तसेच इतर देणी वेळेत दिलेली असल्याने कारखान्याकडे सर्वांचीच पसंती वाढलेली दिसत आहे. कारखान्याचे प्रशासन ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूक ठेकेदार यांच्या विश्वासास पात्र ठरलेला आहे. आगामी हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकरी यांनी चांगल्या रिकव्हरीच्या दृष्टीने चांगल्या प्रतीचा ऊस गाळपास पाठवुन सहकार्य करावे. असे आवाहन चेअरमन माजी आ . राहूल मोटे व एल.एल.पी संचालक सचिन सिनगारे यांनी केले आहे.
यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर संतोष तोंडले, मुख्य शेती अधिकारी विठ्ठल मोरे, चीफ इंजिनिअर राजेशकुमार शिंदे, चीफ अकौंटट विशाल सरवदे, स्टोअर किपर नानासाहेब जाधव, खातेप्रमुख अधिकारी व कर्मचारी आदि आगामी हंगामासाठी परिश्रम घेत आहेत .
दरम्यान, आयान-बाणगंगा साखर कारखान्याने विक्रमी दर दिलेला आहे. कारखान्याने गाळप हंगाम २०२१-२०२२ मध्ये विक्रमी ५४५३०३.४९५ मे टन ऊसाचे गाळप केले आहे. आलेल्या ऊसाकरिता उच्चांकी गाळपाप्रमाणे उच्चांकी प्र.मे.टन २४५१ प्रमाणे अंतिम ऊस दर दिलेला आहे. तरी सभासद, ऊस उत्पादक शेतकरी यांनी कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन माजी आ. राहुल मोटे यांनी केले आहे.