रांजणगाव गणपती : शिरुर तालुक्यातील ढमढेरे वस्ती दडीवडी आंबळे रोड दहीवडी ता. शिरुर जि. पुणे येथील उपकेंद्र ३३/२२ केवी उभारण्याचे काम सिद्घार्थ एंटरप्रायजेस कंपणी अहमदाबाद ता. शिरुर जि. पुणे ही महावितरण कंपणी नवीन उपकेंद्र उभारणीसाठी लागणारे सर्व साहित्य पुरवते.
आज्ञात चोरट्यांनी 4 आणि 5 मे रोजी पहाटे चार च्या सुमारास आज्ञात चोरट्यांनी तारेचे काटेरी कंपाऊंड व जाळी कटरच्या साह्याने तोडून 50 हजार रुपये किमतीचे 55 मीटर लांबीचे 19 कोअर कॉपर कंन्ट्रोल काळ्या रंगाचे केबल चोरून नेले. ही सर्व बाब वॉचमन रामस्वरूप यादव च्या निदर्शनात आल्यानंतर घडलेला प्रकार कंपनीचे मालक आबा विठ्ठल पवार व संबंधित अधिकारी व गावातील ग्रामस्थ महेंद्र ढमढेरे यांना सांगितला.
यासंदर्भात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात कंपनीचे सुपरवायझर अजिनाथ शंकर गर्जे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून पुढील तपास दीप रतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मारकड करत आहेत