नवी दिल्ली : सध्या सोशल मीडिया अॅप्सचा वापर वाढला आहे. त्यात WhatsApp चा वापर इतर अॅप्सच्या तुलनेत अधिक होताना दिसत आहे. त्यानुसारच कंपनीकडून नवनवीन फिचर्स आणले जात आहेत. असे असतानाच आता WhatsApp च्या Status मध्ये बदल केला जाणार आहे. याबाबतची माहिती एका रिपोर्टवरून दिली जात आहे.
Wabetainfo ने याबाबतची माहिती दिली आहे. Wabetainfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp युजर्ससाठी Status सेक्शनमध्ये एक खास फीचर आणण्याची तयारी करत आहे. या नव्या बदलाचा थेट फायदा युजर्सना होणार आहे. कंपनीकडून स्टेट्स सेक्शनसाठी नवीन इंटरफेस आणले जाणार आहे. Status चा नवा इंटरफेस आयफोनच्या इंटरफेससारखा असेल, असेही सांगण्यात येत आहे. यासोबतच अँड्रॉईड युजर्सना अनेक नवीन फीचर्सचा लाभही मिळणार आहे.
WhatsApp च्या नवीन Status इंटरफेसमध्ये स्टेटस म्यूट करण्यासोबतच त्याची तक्रार करण्याचा पर्यायही दिला जाणार आहे. नवीन इंटरफेसमध्ये स्वाईप डाऊन बटण आणि क्रॉस बटणाची सुविधा देखील उपलब्ध असेल, असे सांगितले जात आहे. या फीचरच्या मदतीने ओपन स्टेट्स बंद करता येणार आहे. सध्या याची टेस्टिंग सुरु आहे. नंतर हे फीचर लवकरच सर्व युजर्ससाठी येईल, असे म्हटले जात आहे.