बीड : बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता १०० दिवस उलटून गेले आहेत. मात्र तरीही एक आरोपी फरार असून इतर आरोपींना शिक्षा झालेली नाही. या हत्याप्रकरणी अंगाचा थरकाप उडवणारी माहिती समोर येत आहे. आरोपी महेश केदारने स्वतःच्या मोबाईलमध्ये देशमुख यांना मारहाण करतानाचे तब्बल 15 व्हिडिओ आणि 8 फोटो घेतले होते.हे सर्व समोर आल्यानंतर न्यायालयासमोर सादर करण्यात आले.त्यानंतर आता या हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीच्या जबाबाने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ठरवले असते तर सरपंच संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता का?हा प्रश्न विचारण्याचे कारण संतोष देशमुख केजवरून मस्साजोगकडे प्रवास करताना सोबत असलेल्या प्रत्यक्षदर्शीचा हा जबाब ठरला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांचे ज्या केज -बीड रस्त्यावरील टोलनाक्यावरून अपहरण झाले. याबाबतच्या प्रत्यक्षदर्शीच्या जबाबाने मोठा खुलासा केला आहे. चालकाच्या गळ्यावर कोयता ठेवून आरोपींनी संतोष देशमुख यांचे अपहरण केल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शनीने दिली आहे.त्यानंतर सदरील व्यक्तीने सरपंचांशी बंधू धनजयं देशमुख यांना घटनाक्रम सांगितला. प्रत्यक्षदर्शी आणि धनंजय मुंडे तात्काळ पोलीस स्टेशनला गेले मात्र त्यांना पोलीस स्टेशनमध्ये तीन ते साडेतीन तास बसून ठेवल्याचे त्यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. नवीन कायदा आहे,पुस्तक बघून जबाब लिहावा लागतो असे कारण दिल्याचेही प्रत्यक्ष दर्शनीने आपल्या जबाबामध्ये सांगितले आहे.
विशेष म्हणजे घटनेच्या काही दिवसापूर्वी आवादा कंपनीने या आरोपींच्या विरोधात कंपनीत येऊन धमकावल्याची तक्रार दिली होती. घटनेची गांभीर्य पीआय यांना माहीत होते,त्यांनी ठरवले असते तर सहा रुपयांचे मोबाईल लोकेशन 10 मिनिटं फार तर एका तासात घेता येऊ शकले असते असा दावा देखील प्रत्यक्ष दर्शनीने केला आहे. त्यामुळे केज पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून ते चांगलेचअडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.