शिक्रापूर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर विविध व्यावसायिकांची लगबग सुरु आहे. यातच एका कपड्याच्या दुकानात दिवाळीपूर्वीच चोरट्यांनी डल्ला मारून हजारो रुपयांचे कपडे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत संतोष अशोक सातकर (वय ३९ रा. पारोडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला.
पारोडी (ता. शिरुर) येथे संतोष सातकर यांचे शार्वील टेक्सटाइल मार्केट नावाने कपड्याचे दुकान असून त्यांनी नवीन कपडे दुकानात ठेवून सायंकाळच्या सुमारास दुकान बंद करुन घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास संतोष हे दुकान उघडण्यासाठी गेले असता दुकानाचे शटर उचकटलेले दिसल्याने संतोष यांनी दुकानात पाहणी केली. त्यावेळी दुकानातील तब्बल ७० हजार रुपये किमतीचे कपडे व पाच हजार रुपये रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले.