लोणी काळभोर, (पुणे) : शिताळदेवी नगर मध्ये राहत असणाऱ्या वेगवेगळ्या जातीधर्मातील लोकांमध्ये स्वच्छतेच्या बाबत असणारी जागरूकता निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायक आहे. स्वतःच्या आरोग्यासोबतच सार्वजनिक आरोग्य देखील याठिकाणी जपले जात आहे. त्यामुळे प्राध्यापक सचिन माथेफोड यांच्या मार्गदर्शनाखाली अजून चांगल्या प्रकारचा विकास या नगराचा होत जावो असे मत हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काळभोर
यांनी मांडले.
आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील शिताळदेवी नगर परिसरात रविवारी (ता. ३१) भव्य वृक्षारोपण कार्यक्रम व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काळभोर बोलत होते.
यावेळी डॉ. रतन काळभोर, डॉ. वनिता काळभोर, डॉ. ओमकुमार हलिंगे, डॉ. विकास बनसोडे, डॉ. सुनील गायकवाड, हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बाप्पूसाहेब काळभोर, तुळशीराम घुसाळकर, विजय काळभोर, आळंदी म्हातोबाचे ग्रामसेवक पी. एस. पवार, सोरतापेश्वर देवस्थान अध्यक्ष माऊली लाड, संतोष लांजवडे, संदीप शिवरकर, महेश गायकवाड, सुभाष जवळकर, माऊली जवळकर, भाऊसाहेब जगताप, हरेश गोठे, शिवाजी जवळकर, रवी दगडे, पप्पू सुर्वे, रिहान तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, पूर्व हवेली डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण १३५ कुटुंब सहभागी झाले होते. तसेच हवेली तालुका पत्रकार संघ, पर्यावरण समिती कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबा व पूर्व हवेली डॉक्टर असोसिएशन यांच्या हस्ते देशी, आयुर्वेदिक वृक्षांचे रोपण करण्यात आले. ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने प्रत्येक रविवारी विविध सामाजिक उपक्रम व ग्रामस्थ एकत्र येऊन स्वच्छ्ता मोहीम पार पडली जाते.