पिंपरी : तिसरे अपत्य जन्माला घातल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एका सहाय्यक आयुक्ताला नोकरीतून काढून टाकण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. श्रीनिवास दांगट असे बडतर्फे सहाय्यक आयुक्तांचे नाव आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी ही कारवाई केली आहे. नोकरीला रजू होता दांगट यांनी शंभर रूपयाच्या स्टॅम्पवर किती अपत्य आहे, याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर केले नव्हते. याबाबत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली होती. चौकशीनंतर आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.
आयुक्त शेखर सिंह यांनी याबाबत चौकशी केली. दांगट हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या दिव्यांग कक्षाचे सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत होते. त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. शंभर रूपयाच्या स्टॅम्पवर किती अपत्य आहे, याचे प्रतिज्ञापत्र नियुक्तीच्या वेळी देणे बंधनकारण आहे. मात्र, तसे पत्र नियुक्तीच्या वेळी श्रीनिवास दांगट यांनी सादर केले नाही, अशी तक्रार करण्यात आली होती.