अजित जगताप
सातारा : सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीकै. गुरुवर्य गणपतरावजी गे. काळंगे (गुरुजी)संस्थापक कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांचा अर्धपूर्णाकृती पुतळा अनावरण समारंभ ९ ऑक्टोबर रोजी मोळ ता खटाव येथे दुपारी अडीच वाजता होत आहे.
विश्वनाथ (आण्णा) मिरजकर ज्येष्ठ नेते यांच्या शुभ हस्ते, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांच्या हस्ते व कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्याध्यक्ष उदय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती होत आहे.
या कार्यक्रमाला राजाराम माळी माजी राज्याध्यक्ष, नाना जोशी माजी राज्याध्यक्ष, शिवाजीराव साखरे शिक्षक नेते, म.रा. राजन कोरगांवकर उपाध्यक्ष, म.रा. प्रा. शिक्षक समिती केदुजी देशमाने, श्री. राजेंद्र कोषाध्यक्ष, म.रा. प्रा. शिक्षक समिती राजेंद्र खेडकर संपर्क प्रमुख, म.रा.प्रा.शि.समिती आबा शिंपी प्रवक्ते,म. रा. प्रा. शि. समिती राजेंद्र पाटील ऑडीटर, म.रा.प्रा.शि.समिती सौ. वर्षा केनवडे महिला आघाडी प्रमुख, म.रा.प्रा.शि.समिती सयाजी पाटील राज्य संघटक, म.रा.प्रा.शि. श्री. शिवाजी दुशिंग कार्यालयीन चिटणीस, म.रा.म राजेश सावरकर प्रसिध्दी प्रमुख, म.रा.प्रा.शि,श्री. सुधाकर सावंत न.पा./म.न.पा. आघाडी प्रमुख तसेच राज्य कार्यकारणीचे सर्व सन्माननीय सदस्य, राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस तसेच सातारा जिल्हया आजी-माजी पदाधिकारी, माजी संचालक कार्य हितचिंतक उपस्थित राहणार आहेत, त्यांना सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे.
संयोजक दिपक घनवट, सावळाराम अणावकर, माजी राज्याध्यक्ष प्रभाकरजी आरडे माजी राज्याध्यक्ष काळूजी बोरसे-पाटील माजी राज्याध्यक्ष विजय कोंबे सरचिटणीस, म.रा.प्रा.शिक्षक म.र. प्रा. शिक्षक समिती तसेच स्मारक समिती उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती राज्याध्यक्ष श्री उदय शिंदे, जिल्हाध्यक्ष श्री विश्वांभर रणवरे, नवनाथ जाधव, किरण यादव, अर्जुन यमगर, उमेश पाटील, सागर माने, चंद्रकात मोरे यांनी वडूज ता खटाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
दरम्यान, दरवर्षी गुरुवर्य गणपतरावजी गे. काळंगे (गुरुजी) यांच्या स्मारक स्थळी शिक्षकांचा मेळावा घ्यावा अशी मागणी श्री उदय शिंदे यांनी केली. तर शिक्षक समितीचे खटावचे माजी अध्यक्ष उमेश पाटील यांनी या कार्यक्रमासाठी रोख अकरा हजार एकशे अकरा रुपये देणगी दिली, त्यांचे समितीच्या वतीने मनापासून आभार मानण्यात आले.
.