पाऊस असो की हिवाळा डेंग्यू होण्यासाठी हे ऋतू पुरेसे असतात. याच काळात डेंग्यू डासांची पैदास जास्त प्रमाणात होत असते. त्यामुळे हिवाळ्यात काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. डेंग्यू ताप हा डासांमुळे होणारा विषाणूजन्य संसर्ग आहे जो वेगाने पसरतो. असे जरी असले तरी काही साधे प्रतिबंधात्मक उपाय केल्याने त्याचा प्रसार काही प्रमाणात नियंत्रित करण्यात मदत होऊ शकते.
घरात डास येण्यापासून रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी दरवाजे आणि खिडक्यांवर पडदे लावावेत. यासाठी, कोणत्याही परिस्थितीत डास घरात प्रवेश करणार नाहीत याची काळजी घ्या. त्यासाठी एंट्री पॉईंटच बंद करा. तुम्ही दारे आणि खिडक्यांवर स्टील किंवा प्लास्टिकच्या जाळ्या लावा जेणेकरून डास तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाहीत. जर स्कायलाईट उघडा असेल तर तो देखील बंद करा. जर तुम्हाला डास चावण्यापासून वाचवायचे असेल तर तुम्ही पूर्ण बाह्यांचे कपडे घालावे. जेणेकरून डास चावायला अटकाव होऊ शकतो.
जेव्हाही तुम्ही झोपायला जाल, रात्र असो वा दिवस, तुम्ही मच्छरदाणी वापरू शकता. बाजारात अशी काही क्रीम्स उपलब्ध आहेत जी त्वचेवर लावल्यास डास चावण्यापासून वाचतात. याशिवाय, घराच्या स्वच्छतेबरोबरच परिसराची स्वच्छताही महत्त्वाची असते. त्यामुळे बंद पडलेले खड्डे, तलाव, कारंजे, नारळाच्या शेंड्या, जुने टायर आणि रस्त्यांवरील उघडे नाले यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कारण, यातून डासांची उत्पत्ती होण्याची दाट शक्यता असते.