उरुळी कांचन (पुणे) : पिंपरी (ता. पुरंदर) येथील शेतकऱ्याचे पावसामुळे मोठे नुकसान झाले होते. गुडघाभर पाणी मका या पिकात साचले असल्याने एवढया अडचणीतून त्यांनी स्वीटकोर्नची मका तोडली व त्यांचे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न निघाल्याबद्दल भवरापूर (ता. हवेली) येथील एस.एस. अॅग्रो फुडस कंपनीच्या वतीने शेतकऱ्याचा सत्कार करण्यात आला आहे.
हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीमुळे हातून जात असल्याचे पाहून शेतकरी चिंतातुर झाले होते. पावसानेही हजेरी लावली. या साऱ्याचा परिणाम पिकांवर झाला होता. जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र पिंपरी (ता. पुरंदर) येथील शेतकऱ्यांनी पावसामुळे गुडघाभर पाणी मका या पिकात साचले. एवढया अडचणीतून त्यांनी मका तोडली व त्यांचे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न निघाले.
पिंपरी (ता. पुरंदर) येथील शांताराम हंबीर होते. त्यांनी १५ जूनला एस एस अॅग्रो फुडस कंपनीतून मिठास या जातीचे स्वीटकॉर्न बियाणे पिकाची लागवड केली होती. मागील तीन महिन्यापासून पावसाने हा हा कार माजवला होता. परंतु अशाही परिस्थितीतहि स्वीटकॉर्न मकाची शेती करणारे शेतकरी मात्र तग धरून राहीले. ठरलेल्या वेळापत्रकानुसार तसेच काही खते कंपनीच्या सेड्यूल प्रमाणे व काही खते स्वतःच्या अनुभवाने दिली.
सुरुवातीला एक दोनच पाणी दिले त्यानतंर मात्र पूर्ण मका पाऊसावरच आली मका काढणीला आली परंतु पावसामुळे गुडगाभर पाणी मका मधे साचले.कंपनी चे एकरी सहा टनाचे अॅव्हरेज असताना शांताराम हंबीर यांची मका मात्र एकरात साडे आठ टन निघाली.
त्यामुळे एस. एस. अॅग्रो फुडस कंपनीने त्यांना चागंला भाव दिला व त्यांचा सन्मान कंपनीचे चेअरमन सुभाष साठे यांनी शाल, श्रीफळ व रोख बक्षीस देऊन केला. अशा प्रकारे पावसाने रडवले परंतु तीनच महीण्यात मकेचे सव्वा लाख रुपये मिळाले.यावर शेतकरी शांताराम हंबीर म्हणाले “पावसाने रडवले पण स्वीटकोर्नने हसवले”.