पुणे : सध्या सगळीकडे निवडणुकीची धावपळ सुरु आहे. लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election 2024) पहिले दोन टप्पे पार पडले आहेत. त्यादरम्यानच नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
शासन आणि तेल उत्पादन कंपन्यांच्या वतीने 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरातील गॅस सिलेंडरचे (Commercial LPG gas Cylinders) दर 19 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर या सिलेंडरची किंमत 1745.50 रुपयांवर पोहोचली आहे. संपूर्ण देशभरात हे नवे दर लागू झाले आहेत.
सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत सिलिंडरच्या दरात 19-20 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. IOCL च्या संकेतस्थळावर हे नवे दर देण्यात आले असून त्याची अंमलबजावणी 1 मे पासून केली जाणार आहे.
1 मे पासून व्यावसायिक गॅस सिलिंडर स्वस्त झाला असला तरी घरगुती गॅस सिलिंडरचा भाव मात्र जैसे थेच आहे. यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. व्यवसायिक गॅस सिलिंडर हा हॉटेल, रेस्टॉरंट येथे वापरला जातो. तर 14.2 कोलो वजनाचा गॅस सिलिंडर हा घरातील स्वयंपाकासाठी वापरला जातो. याच घरगुती गॅस सिलिंडरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.