पुणे : श्रीलंकेत सध्या टोमॅटो 1000 रुपये किलो, तर बटाटे 800 रुपये किलोने विकले जात आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना ना गॅस मिळत आहे ना वीज. लोकांना लाकडाच्या चुलीवर अन्न शिजवावे लागत आहे.
परवा रात्री आठ वाजेपर्यंत कोलंबोच्या गोटा परिसरात लोक जमा होत होते. चीनच्या प्रभावाखाली असलेल्या श्रीलंका सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे श्रीलंकेतील परिस्थिती उद्भवल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. श्रीलंकेतील लोकांनी राष्ट्रपती भवन कसे ताब्यात घेतले हे संपूर्ण जगाने पाहिले. आता देशात ना राष्ट्रपती आहे ना कायदा आणि सुव्यवस्था.
श्रीलंकेची राजधानी कोलंबोच्या पॉश एरिया गोटा सर्कलमध्ये राहणारे एक नागरिक म्हणतात की, गॅस सिलिंडरसाठी चार महिन्यांची प्रतीक्षा यादी आहे. परिणामी लाकडाचा वापर करून चुलीवर अन्न शिजवावे लागत आहे. सध्या कोलंबोच्या बाजारात टोमॅटोचा भाव 1000 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. रविवारी बाजारात बटाट्याला 700 रुपये किलो तर कोबीला 800 रुपये किलो भाव होता.
श्रीलंकेत सध्या वीज, पाणी, रेशन, पेट्रोल आणि डिझेल मिळत नसल्याने लोक बंड करत आहेत. देशाची जबाबदारी असलेले लोक श्रीलंकेतून पळून गेले आहेत. देशाला सांभाळायला कोणीच उरले नसताना ही महागाई कोणी कशी रोखणार असा प्रश्न आहे. स्थानिक व्यापारी सांगतात की, यावेळी प्रत्येक श्रीलंकन नागरिकाला आपला देश सोडून पळून जावेसे वाटते. कारण जी परिस्थिती आहे ती श्रीलंकेत राहण्यास योग्य नाही. श्रीलंकेची आजची परिस्थिती चीनमुळेच असल्याचे त्यांनी सांगितले.
चार महिन्यांपूर्वी श्रीलंकेच्या बाजारपेठेत १२५ रुपये किलोने मिळणारे पीठ सध्या ४०० ते ५०० रुपये किलो दराने विकले जात असल्याचे त्यांनी सांगितले. पेट्रोलचा दर साडेचारशे रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे.