Pachagani News : पाचगणी : घरमालक आणि भाडेकरू यांच्यात भाडेकरार (लिव्ह अँड लायसन्स) झाल्यानंतर घरमालकांनी पोलीस ठाण्यांमध्ये जाऊन याची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच मालमत्ता भाड्याने देणाऱ्या एजंट यांनी देखील भाडेकरुची माहिती दिलेल्या नमुना फॉर्ममध्ये भरून पोलीस ठाण्यात द्यावी, अशा सूचना पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी दिल्या आहेत.(Pachagani News)
घरमालक आणि भाडेकरू यांच्यात भाडेकरार.
पाचगणी पोलिसांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र रेंट ॲक्ट १९९९ मधील कलम २४ अन्वये पाचगणी भागातील प्रत्येक घर मालक, सोसायटी चेअरमन, सेक्रेटरी तसेच नागरिकांनी भाडेकरुची माहिती पोलीस स्टेशन येथे देणे हे बंधनकारक आहे. घर मालकाने भाडेकरुची माहिती पोलीस स्टेशन येथे वेळेत सादर न केल्यास घर मालकाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल.(Pachagani News)
सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी यांनी भाडेकरुचे पोलीस पडताळणी झाल्याशिवाय भाडेकरुंना सोसायटीमध्ये प्रवेश देऊ नये. प्रवेश दिल्यास त्यांच्यावर प्रचलित कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच ते सर्वस्व जबाबदार राहतील. ऑनलाईनद्वारे भाडेकरुंची पडताळणी केल्यास त्याची एक कॉपी पोलीस स्टेशन येथे घर मालकाने देने हे बंधनकारक असेल.(Pachagani News)