राहुलकुमार अवचट
यवत – यवत (ता. दौंड) येथील धान्य बाजार मैदान येथे भव्य दहीहंडी उत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन युवानेते तुषार दादा युथ फाऊंडेशन व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी यवत यांच्यावतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमसाठी प्रमुख उपस्थित म्हणुन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थितांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार व पुणे जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक रमेश थोरात यांनी मनोगत व्यक्त केले.
२ वर्षानंतर दहीहंडी साजरी होत असल्याने यवत पंचक्रोशीसह तालुक्यातील अनेक गोपाळभक्तांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. सुरवातीलाच पुणे येथील आदिमाया ढोल-ताशा पथकांने तरुणाईत चैतन्याचे वातावरण निर्माण करत परिसर दुमदुमवला. यावेळी डी.डी लाईट्स अँन्ड साऊंडच्या आकर्षक रोषणाई व आवाजाने तरुणांई मनमुराद नाचण्याचा आनंद घेतला. तर रंग नवा ढंग नवा या नृत्याच्या कार्यक्रमाने महिलांना देखील उत्सवाचा आनंद घेतला. युवानेते तुषार थोरात यांचे आगमन होताच तरुणाईने मोठा जल्लोष केला.
दरम्यान, दहीदंडी फोडण्यासाठी जिल्हातील अनेक पथकांनी सहभाग घेतला. जय दहीहंडी पथक, गुणवडी ( बारामती ) यांनी ५ थर लावून फोडली. यानिमित्ताने चषक व १,११,१११/- रुपये रक्कम बक्षिस जिंकले.
यावेळी तुषार थोरात यांनी युवा फाऊंडेशन व यवतकरांचे आभार व्यक्त करत अतिशय भव्य दिव्य अशी दहीहंडीचा उत्सव आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहून भारावून गेल्याचे सांगितले. यावेळी परिसरातील अनेक पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, वैशाली नागवडे, नितीन दोरगे, दिलीप हंडाळ, कुंडलीक खुटवड, सदानंद दोरगे, गणेश कदम,संजय शहा, दत्तात्रय दोरगे पाटील, दिलीप यादव,आबासाहेब दोरगे, सागर खुटवड, सागर दोरगे, मंगेश रायकर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोहन दोरगे यांनी केले.