पुणे : बँकेत नोकरी मिळावी यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यासाठी अनेक परीक्षा, टेस्ट दिल्या जातात. पण, तुमची ही इच्छा आता पूर्ण होऊ शकते. कारण, सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स को-ऑप. असोसिएशन लिमिटेड, सोलापूर येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
सोलापुरातील सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स को-ऑप. असोसिएशन लिमिटेड येथे लिपिक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सोलापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी किमान वय हे 22 असावे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.surbanksassociation.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : लिपिक.
– वयोमर्यादा : किमान 22 वर्षे आणि कमाल 35 वर्षांपेक्षा अधिक नसावे.
– नोकरीचे ठिकाण : सोलापूर.
– अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख : 17 जानेवारी 2025.
– परीक्षा शुल्क : रु. 500/- + (18% GST) + बँक व्यवहार शुल्क.